नवजामधील ओझर्डे धबधबा वाहू लागला   

सातारा, (प्रतिनिधी) : पाटणसह कोयना परिसरात गेल्या आवडाभरापासून दिवस-रात्र पडत असलेल्या संततधार अवकाळी पावसामुळे मे महिन्यातन डोंगरदन्यातील छोटे-मोठे धबधबा वाहण्यास सुरुवात झाली आहे. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा धुक्यात हरवलेला नवजा येथील प्रसिध्द ओझर्डे धबधबा सह्याद्रीच्या कुशीतून फेसाळत वाहू लागला आहे. त्यामुळे आतापासूनच पर्यटकांची पावले या वळू लागली आहेत, तर संततधार पावसामुळे कोयनानगर परिसरने हिरवी चादर परिधान केल्याने कोयनेचा निसर्ग पर्यटकांना खुणावू लागला आहे.
 
तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाळासदृश वातावरण तयार झाले आहे. संततधार पावसामुळे ओढे, नदी, नाले, छोटे, मोठे  देखील बाहू लागल्याचे दिसून येत आहे. कोयनेच्या वर्षा पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेला  ओझर्डे  धबधबा हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून वाहण्यास सुरुवात होते. 
 
मात्र, कोयना विभागात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे मे महिन्यातच ओझर्डे  धबधबा प्रवाहित होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता  हौशी पर्यटकांची पावले कोयनानगरच्या दिशेने वळू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

Related Articles